शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची कारागृहात रवानगी

By admin | Updated: April 13, 2017 03:55 IST

वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक अमोल बालवडकर (रा. बालेवाडी) यांना अटक करून

पुणे : वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक अमोल बालवडकर (रा. बालेवाडी) यांना अटक करून बुधवारी न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आल्याने त्यांंंची रवानगी येरवडा कारागृहात झाली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. भंडरवार यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे़ सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एखाद्या नगरसेवकाची कारागृहात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे़शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी दुपारी बालवडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले़ अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली़ त्यानंतर बालवडकर यांच्या वतीने जामीन अर्ज करण्यात आला़ त्याला सरकारी वकील एस़ सी़ शिंदे यांनी विरोध केला़ बालवडकर हे नगरसेवक आहेत़ त्यांनी पदाचा गैरवापर करून पोलिसांवर दबाव आणून सरकारी कामात अडथळा आणला़ फिर्यादी दारू प्यायले असल्याचा आरोप करून त्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझरवर टेस्ट करायला भाग पाडले़ वरिष्ठांकडे खोटी तक्रार केली़ नगरसेवक असलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य अपेक्षित नाही, असा युक्तीवाद शिंदे यांनी केला़ तो ग्राह्य धरून न्यायालयाने बालवडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला़पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले, की बालवडकर यांना दुपारी दीडच्या सुमारास अटक करण्यात आली.नो पार्किंगमध्ये कार लावल्याने वादजंगलीमहाराज रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नो-पार्किंग आणि नो हॉल्टिंगबाबत विशेष कारवाई सुरू होती. त्यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा कारचालक गणेश चौधरी नो पार्किंगमध्ये कार उभी करून आतमध्ये मोबाइलवर खेळत बसला होता. डामसे यांनी चालकाला कार काढण्यास सांगितले. मात्र त्याने पोलिसांबरोबर वादावादी केल्यामुळे कारला जॅमर लावण्यात आला. डामसे पुढील चौकात गेले असता बालवडकर यांनी पदाचा गैरवापर करत कारवाई करू नका, तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला़ त्यावरून बालवडकर आणि गणेश चौधरीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता़