अध्यक्षपदाची चर्चा म्हणजे ‘बाजारात तुरी’ - शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST2021-01-25T04:11:30+5:302021-01-25T04:11:30+5:30

पुणे : काँग्रेसच्या अध्यक्षपदाविषयीची चर्चा म्हणजे '' बाजारात तुरी'' या म्हणीसारखे आहे. खरं म्हटलं तर मला याविषयी काहीच माहिती ...

The discussion of the presidency is 'Bazaar Turi' - Shinde | अध्यक्षपदाची चर्चा म्हणजे ‘बाजारात तुरी’ - शिंदे

अध्यक्षपदाची चर्चा म्हणजे ‘बाजारात तुरी’ - शिंदे

पुणे : काँग्रेसच्या अध्यक्षपदाविषयीची चर्चा म्हणजे '' बाजारात तुरी'' या म्हणीसारखे आहे. खरं म्हटलं तर मला याविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळे आत्ता काहीच सांगता येत नाही, असे बोलत काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या प्रश्नाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बगल दिली.

जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्षपदाबाबत निर्णय झालेला नव्हता. आता जूनमध्ये ही बैठक होणार असून, सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला संधी मिळाली, तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का? याविषयी शिंदे यांना विचारले असता त्यांनी शिताफीने ‘बाजारात तुरी’ असे सांगत प्रश्नाचे उत्तर टाळले.

तसेच औरंगाबाद नामांतर हा सरकारमधील प्रश्न आहे आणि मी सरकारबाहेरील व्यक्ती आहे, अशी भूमिका घेत शिंदे यांनी नामांतराबाबतचा प्रश्नही टोलवला.

....

Web Title: The discussion of the presidency is 'Bazaar Turi' - Shinde