Pune: टिळक रोडवर भरदिवसा विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:01 IST2022-01-11T17:54:32+5:302022-01-11T18:01:00+5:30
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थिनीचा शास्त्री रस्त्याजवळील सॅफरॉन हॉटेलजवळ विनयभंग केल्याची घटना घडली

Pune: टिळक रोडवर भरदिवसा विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे
पुणे : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थिनींचा शास्त्री रस्त्याजवळील सॅफरॉन हॉटेलजवळ विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नवी पेठेतील २५ वर्षीच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतात. सोमवारी सकाळी त्या शास्त्री रस्त्यावरुन टिळक रस्त्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर एक तरुण त्यांच्यासमोर आला व त्याने अश्लिल चाळे केले. तसेच, त्यांना अश्लिल बोलून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत. यापूर्वीही एका विक्षिप्त तरुणाने अशा प्रकारे अश्लिल चाळे करण्याचा प्रकार या भागात केला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती.