Director Praveen Tarade's car accident at Saswad in Pune | दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने दुखापत नाही

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने दुखापत नाही

पुणे : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री अकरा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

सासवडमधील हिरवे गावातील महादेव मंदिरासमोर हा अपघात झाला. यावेळी प्रवीण तरडे यांच्यासोबत अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणे गाडीत होते. महादेव मंदिरासमोरील वळणावर गाडीने रस्ता सोडला असता ब्रेकच्या साहाय्याने गाडीवर नियंत्रण आणले. मात्र, रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर गाडी धडकली. सुदैवाने या अपघातात गाडीतील एअर बॅग्समुळे कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी सासवड पोलीस दाखल झाले असून सर्वजण सुखरूप असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, काल प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे -सोलापूर रोडवर अपघात झाला होता. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. यात आनंद शिंदे यांच्यासह 3 जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Director Praveen Tarade's car accident at Saswad in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.