त्याने मुलगी मेलीये का? हे पाहण्यासाठी कर्कटकाने ओढले मृतदेहावर ओरखडे, तरुणाला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:15 IST2022-01-10T21:15:08+5:302022-01-10T21:15:16+5:30
तिच्या चेह-यासह शरीरावर 25 ठिकाणी ओरखडे ओढून जखमा करणा-या 19 वर्षीय विकृत तरूणाला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली

त्याने मुलगी मेलीये का? हे पाहण्यासाठी कर्कटकाने ओढले मृतदेहावर ओरखडे, तरुणाला जन्मठेप
पुणे: एकतर्फी प्रेमातून दहावीमध्ये शिकणा-या अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचे नाक, तोंड दाबून खून करणा-या आणि त्यानंतर ती मेली आहे का हे तपासून पाहण्यासाठी कंपासपेटीतील करकटकाने तिच्या चेह-यासह शरीरावर 25 ठिकाणी ओरखडे ओढून जखमा करणा-या 19 वर्षीय विकृत तरूणाला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला. आकाश नाथा कोळी (वय 19, रा. भेगडे चाळ, पाषाण) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपीने दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंड आणि भादंवि कलम 404 अन्वये तीन वर्षे शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात खून, बलात्काराचा
प्रयत्न या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषाण परिसरात शिकवणीवरून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलगी पायी घरी परतत असताना 8 सप्टेंबर 2012 रोजी हा प्रकार घडला. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी 19 साक्षीदार तपासले. त्यामध्ये नोडल ऑफिसर दत्ता अंगरे यांची साक्ष महत्वाची ठरली.
इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी 8 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत शिकवणीवरून घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, दुस-या दिवशी पाषाण येथील डीएससी क्वार्टर्सक्च्या मोकळ्या मैदानावर मुलीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून वडापावच्या गाडीवर काम करणा-या आकाश कोळी याला अटक केली.
मुलीवर एकतर्फी प्रेम असलेल्या कोळी याने घटनेच्या दिवशी रात्री साडेसात वाजता शिकवणीवरून परतत असलेल्या मुलीस अडविले आणि तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, मुलीने त्याला नकार दिल्यामुळे चिडलेल्या कोळी याने तिला ओढत रस्त्याच्या बाजूच्या मैदानावरील झुडपात नेले तसेच मुलीने मदतीसाठी ओरडू नये यासाठी त्याने गवताने तिचे नाक आणि तोंड दाबून धरले. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यात तिचा मृत्यू झाला. ती मेलीये का हे पाहण्यासाठी तिच्या शरीरावर करटकाने ओरखडे ओढले आणि मृतदेह टाकून तो मुलीचा मोबाईल घेऊन पळून गेला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले होते.