Diesel transport tanker accident in Shikrapur- chakan highway, fuel theft | चाकण - शिक्रापूर महामार्गावर डिझेल वाहतुक करणारा टँकर पलटी, इंधनाची लूट  
चाकण - शिक्रापूर महामार्गावर डिझेल वाहतुक करणारा टँकर पलटी, इंधनाची लूट  

ठळक मुद्देडिझेल वाहतूक करणारा टँकर पलटीअपघातात वाहन चालक किरकोळ व अन्य दोनजण गंभीर जखमी

शेलपिंपळगाव :  चाकण - शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता.खेड) हद्दीत डिझेल - पेट्रोलची वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. अपघातात टँकरने रस्त्यालगत दोन ते तीन पलटी घेतल्याने टँकरच्या झाकणांमधून इंधनाची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. सुदैवाने इंधनाची गळती होऊनही अन्य घटना घडली नाही.
दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी पेट्रोल व डिझेलची यथेच्छ लूट केली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (दि.२२) सकाळी सहाच्या सुमारास घडला. इंधन वाहतूक करणारा टँकर (एमएच ०३ सीपी ५९५७) चाकण बाजूकडून शिक्रापूरकडे जात होता. मात्र, शेलपिंपळगावच्या पूर्वेला लोखंडी दरवाजा परिसरात वाहनाला अपघात होऊन टँकर रस्त्यालगतच्या चारीत पलटी झाला. अपघातात वाहन चालक किरकोळ व अन्य दोनजण गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी चाकण पोलिसांनी धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला.


Web Title: Diesel transport tanker accident in Shikrapur- chakan highway, fuel theft
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.