पुण्यात सुरक्षारक्षकाकडून PMPMLच्या बसमधील डिझेलची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 14:46 IST2021-10-20T14:45:48+5:302021-10-20T14:46:39+5:30
पुणे: शहरात एक सुरक्षारक्षक पीएमपीएमएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळ) बसमधील इंधन चोरी करताना आढळल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

पुण्यात सुरक्षारक्षकाकडून PMPMLच्या बसमधील डिझेलची चोरी
पुणे: शहरात एक सुरक्षारक्षक पीएमपीएमएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळ) बसमधील इंधन चोरी करताना आढळल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गणेश धनगवार (वय 25) असून तो झांबरे वस्ती, बिबवेवाडीमध्ये राहतो. PMPMLच्या सुरक्षा विभागाचे प्रभाग निरीक्षक अविनाश सोनवणे यांनी मंगळवारी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी धनगवार मंगळवारी पहाटे 3.30 च्या सुमारास बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर येथील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या पीएमपीएमएल बसच्या इंधन टाकीतून डिझेल चोरत असल्याचे आढळून आले. त्याने 500 रुपये किमतीचे सुमारे 5 लिटर डिझेल एका कॅनमध्ये काढले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी गणेश धनगवारला ताब्यात घेतले आहे.