शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

मधुमेह दिन विशेष : कुमारवयातच पडतोय मधुमेहाचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 1:46 AM

पुण्याची स्थिती : खासगी संस्थेचा अभ्यास, मुलींमध्ये अधिक प्रमाण

पुणे : मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता या आजाराचा विळखा कुमारवयातच पडू लागल्याचे पुण्यातील एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यातही या वयातील मुलांपेक्षा मुलींमध्ये टाईप २ मुधमेहाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच या आजाराच्या लक्षणांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये बैठे काम असलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. भारतीयांमध्ये तो तुलनेने कमी वयोगटांत म्हणजे १८ ते ३० वर्षे या वयोगटात आढळून येत आहे. एका खासगी संस्थेने पुणे शहरातील त्यांच्याकडे आलेल्या १२ हजार १८२ जणांच्या मधुमेहाबाबतच्या माहितीचा अभ्यास केला. ही माहिती सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीतील आहे. या अभ्यासानुसार २० वर्षांखालील दहा टक्के मुलींना मधुमेहाचा विळखा पडला आहे, तर तेवढ्याच मुली काठावर आहेत. त्या तुलनेत ८ टक्के मुले मधुमेहग्रस्त असून ५ टक्के काठावर आहेत. वयोगट वाढत गेल्यानंतर ही स्थिती उलटी झाली आहे. पुरुषांमध्ये तुलनेने मधुमेह अधिक आढळून आला आहे.मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्णांना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह असतो. हा मधुमेह प्रामुख्याने पन्नाशीनंतर होतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही याची लक्षणे दिसू लागल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ताणतणाव, बैठे काम असलेली जीवनशैली आणि लठ्ठपणा ही स्त्रियांमध्ये मधुमेह वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. इंड्स हेल्थ प्लसचे सहव्यवस्थापकीय संचालक अमोल नायकवडी म्हणाले, तरुण पिढीमध्ये उद्भवणाºया मधुमेहाच्या वाढत्या संख्येमुळे या रोगासाठी कुठलेही सुरक्षित वय नाही हे दिसून येते. अल्पवयात होणाºया मधुमेहाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी उपचाराचे गंभीरपणे नियोजन केले पाहिजे. जीवनशैलीतील बदल, रोजचा व्यायाम, पोषक आहाराचे सेवन, तपासणी अशा याकडे दुर्लक्ष होऊ नये.डोळ््यांचा विकार बळावतोयमधुमेहामुळे डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) नावाचा डोळ्यांचा विकार बळावत आहे. रुग्णांतील जागृतीचा अभाव आणि या आजारांशी संबंधित उपचारांच्या माहितीबाबत अज्ञान हे त्यामागचे कारण आहे. मधुमेही युवकांनी दर ६ महिन्यांनी डोळे तपासणी करणे आवश्यक असते. सध्या उपलब्ध अद्ययावत उपचार पद्धतींद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.- डॉ. नितीन प्रभुदेसाई, नेत्ररोगतज्ज्ञमधुमेहाची पुण्यातील वयनिहाय स्थिती (टक्केवारी)वयोगट स्थिर काठावर मधुमेहग्रस्तमहिला पुरुष महिला पुरुष महिला पुरुष२० वर्षांखालील ३९ २७ १० ५ १० ८५०-५९ ३० ३३ ६ ९ १० १२६०-६९ २० ३६ ५ ११ ९ २०७०-७९ २० ३६ ५ १६ ५ १८

८० वर्षांपुढे २९ २१ ७ २१ ७ १४एकूण २९ ४२ ५ ८ ६ ११ 

टॅग्स :diabetesमधुमेहPuneपुणेHealth Tipsहेल्थ टिप्स