इंदापूर विद्यार्थी कॉंग्रेसकडून धवलसिंह यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:12 IST2021-02-09T04:12:21+5:302021-02-09T04:12:21+5:30

धवलसिंह मोहिते यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळणार असल्याचे या वेळी विद्यार्थी काँग्रेसचे अभिजित ...

Dhawal Singh felicitated by Indapur Student Congress | इंदापूर विद्यार्थी कॉंग्रेसकडून धवलसिंह यांचा सत्कार

इंदापूर विद्यार्थी कॉंग्रेसकडून धवलसिंह यांचा सत्कार

धवलसिंह मोहिते यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळणार असल्याचे या वेळी विद्यार्थी काँग्रेसचे अभिजित गोरे यांनी सांगितले. यावेळी सोलापूर जिल्हा तसेच इंदापूर तालुका हा पूर्वीपासूनच कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेचा असल्याने मोठे काम करण्याची संधी पक्षामध्ये आहे. तरुणांना संघटित करून कॉंग्रेस पक्षाला नवचैतन्य देण्याचे काम करायचे आहे. इंदापूर तालुक्यातील साधारण एक ते दीड वर्षात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आपले स्थान निर्माण करेल व त्यासाठी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टयासह इंदापूर तालुक्यात विशेष लक्ष घालण्यात येईल, असे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

--

०८ इंदापूर धवलसिंह मोहिते पाटील

फोटो ओळी : धवलसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करताना विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित गोरे, सुदर्शन रणवरे व इतर.

Web Title: Dhawal Singh felicitated by Indapur Student Congress