शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:21 IST

त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पुणे : धनंजय मुंडे हे मंत्री आहेत तर सुरेश धस हे आमदार आहेत. त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या भेटीसंदर्भात देशमुख कुटुंबीयांच्या भावना याेग्य आहेत. कारण त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेला आहे, असेही नमूद केले.पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवी समारंभास अजित पवारांनी शनिवारी उपस्थिती लावली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, धस-मुंडे यांची विचारधारा वेगळी असली, तरी एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यांचे पूर्वीपासून संबंध आहेत. सहकारी आजारी असल्याने धस मुंडेंना भेटले, याचा वेगळा अर्थ काढू नये. संतोष देशमुख प्रकरणाचा सीआयडी, एसआयटी, न्यायालयातून लवकर रिपोर्ट येईल. त्यानंतर दोषींना कडक कारवाई करू. दोषीची फिकीर केली जाणार नाही. एक व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. तपास यंत्रणांना कोणालाही सोडणार नाही. आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालणार नाही, असेही पवार म्हणाले.

‘पुण्यातील वाहतूक नियंत्रणासाठी भुयारी मार्गाच्या पर्यायाविषयी चर्चा झाली. यामध्ये कात्रज ते येरवडा हा सहा पदरी भुयारी मार्ग उभारण्यास मान्यता दिली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एक हजार सीएनजी बसेस घेतल्या जाणार आहेत. पुढील काळात पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडची लाेकसंख्या अधिक हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासंदर्भात टाटाच्या मुळशी धरणातून पाणी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दाेन्ही शहरातील पाण्याची गरज भागविली जाऊ शकते.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयाेग करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नदी सुधार प्रकल्पाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढले जातील. जीबीएस हा आजार पाण्यामुळे हाेत असल्याची चर्चा हाेती. आता काेंबड्यांचे मांस खाऊन हा आजार हाेत असल्याची माहिती पुढे येत आहे. मांस कच्चे खाल्ल्याने हा आजार हाेत आहे, त्यामुळे काेंबड्या मारून टाकण्याचे काही कारण नाही,’’ असेही अजित पवार यांनी नमूद केले.निवडणुका होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील"ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्याबाबतही चांगले वकील देऊन हा प्रश्न मार्गी लावू. ओबीसी घटकालाही इतरांप्रमाणे निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा झाली आहे.' लोकांचे प्रश्न नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य सोडवत असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

रिंगरोडचे काम लवकरच सुरू होईलरस्ते महामंडळाचा रिंगरोड करत आहोत, त्याचे चार-पाच निविदा अंतिम झाल्या आहेत, उर्वरित निविदा अंतिम होतील. रिंगरोड जातो, तेथे काही ठिकाणी इमारती झाल्या आहेत, तेथे बाजूने रिंगरोड जाईल. इमारती सोडून बाजूची जमीन संपादित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना दिले आहेत. पीएमआरडीएच्या रिंगरोडचे काम लवकरच सुरू होईल, असेही पवार म्हणाले. अजित पवार असेही म्हणाले...

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काेल्ड वाॅर असल्याच्या चर्चा खाेट्या आहेत. बातम्या नसल्या की अशा बातम्या तुम्ही चालविल्या जातात.

- नदी सुधारमुळे पुराचा धोका वाढेल, हा आरोप चुकीचा आहे, जलसंपदा विभागाने याउलट नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन काम करू.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSuresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवार