शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुणे शहरातील धनकवडी, सहकारनगर ऑक्सिजनचे आगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 6:00 AM

गेल्या काही वर्षात काँक्रिटचे जंगल झालेल्या पुण्यात अजूनही तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त झाडे आहेत.

ठळक मुद्देशहरातील हिरवाई: मध्यभाग मात्र इमारतींचे जंगलपालिकेचा वृक्षगणनेची परिसरनिहाय आकडेवारी असलेला अहवाल तयार शहरात वृक्षराजीचा समतोल निर्माण होण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत वृक्षगणनेनुसार देशी वृक्षांची लागवड कमी होत असल्याचे निदर्शनास

पुणे : गेल्या काही वर्षात काँक्रिटचे जंगल झालेल्या पुण्यात अजूनही तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त झाडे आहेत. सर्वाधिक वृक्षराजी धनकवडी, सहकारनगर भागात असून त्या तुलनेत कसबा, भवानी या मध्यभागात मात्र निव्वळ इमारतींचे जंगल उभे आहे. पालिकेने केलेल्या शहरातील वृक्षगणनेनुसार देशी वृक्षांची लागवड कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या वृक्षसंख्येमुळे त्या परिसरातील ऑक्सिजन या प्राणवायूचे प्रमाणही वाढत असल्यामुळे शहरात वृक्षराजीचा समतोल निर्माण होण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.या वृक्षगणनेची परिसरनिहाय आकडेवारी असलेला अहवाल नुकताच तयार झाला आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांप्रमाणे त्यांच्या हद्दीतील वृक्षसंख्या यात देण्यात आली आहे. त्यानुसार धनकवडी, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १० लाख १५ हजार १४४ वृक्ष नोंदले गेले आहेत. सर्वात कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाची आहे. त्यांच्या हद्दीतील वृक्षसंख्या फक्त १२ हजार ७४ इतकीच आहे. त्यानंतर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३२ हजार १६२ वृक्ष आहेत. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय ६५ हजार ६७२, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय ७२ हजार २५ इतके वृक्ष नोंदवण्यात आले आहेत. दोन लाखापेक्षा जास्त वृक्षसंख्या असलेली क्षेत्रीय कार्यालये याप्रमाणे- नगररस्ता-वडगावशेरी- ४ लाख ९४ हजार २०, कोथरूड- बावधन- ३ लाख ८८ हजार ७८३, हडपसर-मुंढवा- ३ लाख ८६ हजार ९५, येरवडा-कळस-धानोरी- २ लाख ४० हजार ११०, कोंढवा-येवलेवाडी- १ लाख ९१ हजार ४५९, ढोले पाटील-२ लाख ८२ हजार ४६१, वारजे-कर्वेगर- १ लाख ५५ हजार ७५४, औंध बाणेर- ३ लाख १८ हजार ९०८, शिवाजीनगर घोले रस्ता- ३ लाख ५५ हजार २४. याच गणनेत देशी वृक्षांच्या लागवडींची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एकूण वृक्षगणनेत फक्त २८ टक्के व परदेशी वृक्षांची संख्या ७२ टक्के दिसते आहे. परदेशी वृक्षांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. गुलमोहर, सुबाभूळ तसेच देशी समजले जाणारे अन्य काही वृक्ष प्रत्यक्षात परदेशी असल्यामुळे देशी वृक्षांची संख्या कमी दिसते आहे. वड, पिंपळ, चिंच, फणस, जांभूळ, नारळ, सुपारी असे वृक्ष देशी समजले जातात. एक पूर्ण वाढलेला वृक्ष एका व्यक्तीला दिवसभर पुरेल इतका ऑक्सिजन तीन ते चार दिवसांत वातावरणात सोडत असतो. तसेच तो हवेतील कार्बन डाय ऑक्साईडही शोषत असतो. त्याशिवाय वृक्षांवर पक्षीजीवन असते. त्यावरच प्राणीजीवनही अवलंबून असते. पाण्यासाठीही वृक्षराजीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मानवी जीवनासाठीही वृक्ष आवश्यक आहेत. पुण्यात माणशी एक वृक्ष असे प्रमाण या गणनेनुसार दिसत असून ते आणखी वाढायला हवे असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका