Pune: देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा टेम्पोच्या धडकेत मूत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 12:54 IST2024-03-09T12:53:52+5:302024-03-09T12:54:18+5:30
राजगुरुनगर (पुणे) : दुचाकीवर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गोसासी (ता. खेड) येथे (दि. ८)घडली आहे. ...

Pune: देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा टेम्पोच्या धडकेत मूत्यू
राजगुरुनगर (पुणे) : दुचाकीवर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गोसासी (ता. खेड) येथे (दि. ८)घडली आहे. सतीश माणिक शिळीमकर (वय ५५, रा. धनकवडी, साई सिद्धी चौक, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश शिळीमकर हे यमाई देवीच्या दर्शनासाठी सकाळी दुचाकीवरून कनेरसर येथे जात होते. दरम्यान, गोसासी येथे दुचाकीवर असलेले सतीश शिळीमकर व टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात शिळीमकर यांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच मुत्यू झाला. या घटनेबाबत जयराम सतीश शिळीमकर यांने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.