शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 14:55 IST

ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे

पुणे : महाराष्ट्र्रात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. अजित पवार आणि त्यांच्या पक्षानी देवेंद्र फडणवीस चालतील अशी भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतच्या नावाचा तिढा आता सुटला आहे. अशातच आमदार छगन भुजबळ यांनी पुण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

भुजबळ म्हणाले, ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं आहे. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं आहे. पण यावेळी भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल फडणवीस झाले तरी आनंदच होईल. 

मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ईव्हीएम मशीन ने जिंकलो असेल. तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. संजय राऊत टीका करतात याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले,  पाच वर्ष त्यांना काही कामं नाही म्हणुन टीकाच करावी लागणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदे