अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 13:54 IST2023-08-13T13:53:53+5:302023-08-13T13:54:27+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis' first reaction to Ajit Pawar and Sharad Pawar meeting | अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले,...

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले,...

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. शरद पवार आज पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे, यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली.

अजित पवार खुश नाहीत, कदाचित..; शरद पवार-अजितदादा भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी संदर्भात मला काहीही माहिती नाही. त्यांची भेट कधी झाली, किती वेळ झाली याची माहिती माझ्याकडे अजिबात नाही. मला अशी माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्की सांगतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीची बातमी माध्यमांना कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजितदादांना साथ देत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही दिवसांनी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण सेंटर इथं जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. एकदा नव्हे तर दोनदा ही भेट झाली होती. शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, पक्षात कुठेही फूट पडू नये यासाठी भेट झाल्याचे त्यावेळी प्रफुल पटेल यांनी माध्यमांना सांगितले होते.

Web Title: Devendra Fadnavis' first reaction to Ajit Pawar and Sharad Pawar meeting