Devendra Fadnavis: जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:01 IST2025-04-05T16:00:38+5:302025-04-05T16:01:21+5:30

रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल, ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे

Devendra Fadanvis Where there is a mistake there is a mistake Fadnavis reaction regarding Dinanath Hospital | Devendra Fadnavis: जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा

Devendra Fadnavis: जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा

पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत समितीही नेमली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची पुण्यात भेट घेतली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल, असे म्हणत फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे. मी नेमलेल्या समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही. तोपर्यंत आता तरी बोलणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. हॉस्पिटलबाहेर सातत्याने विविध पक्ष, संघटना आंदोलन करत आहेत. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चुकीचे आहे. 

कठोर कारवाई केली जाईल 

दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. अशा घटना रुग्णालयात घडणे चुकीचे आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील

आता रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्याने काही अधिकार देण्यात आले आहेत. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. 

Web Title: Devendra Fadanvis Where there is a mistake there is a mistake Fadnavis reaction regarding Dinanath Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.