शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विकास आराखडा अंतिम टप्प्यात - नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:15 AM

नवल किशोर राम : श्रीक्षेत्र वढू बुद्रुकच्या समाधिस्थळाला भेट देऊन शंभूराजेंना अभिवादन

कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असून, शंभूछत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासातून समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोरराम यांनी सांगीतले. शंभूराजांच्या स्मारक परिसराचा विकास आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करून त्यास मान्यताही देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत वढू हे देशात आदर्श प्रेरणास्थान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज यांच्या ३३० वा बलिदानस्मरण दिन आज दि.५ एप्रिल रोजी झाला. सकाळी शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, डॉ. जयंत मिना, अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षकसदाशिव शेलार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समिती सदस्या सविता पºहाड, सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांतशिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, साहेबराव भंडारे, जिल्हा बँकेच्या संचालक निवृत्ती गवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोषशिवले, सचिन भंडारे, नवनाथ गुंडाळ, संजय शिवले, संभाजी भंडारे, सुनीता भंडारे, निर्मला भंडारे, निर्मला आरगडे, सोसायटीचे अध्यक्षविश्वास शिवले, माजी अध्यक्ष संजय शिवले, सचिन शिवले, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, आदी उपस्थित होते.

शंभूराजांच्या समाधीची शासकीय पूजा केल्यानंतर उपस्थितांनी शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पूजा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय पूजेस आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या वतीने शंभुप्रतिमा देऊन सन्मानीत करण्यात आले.वढू बुद्रुक येथे शंभूराजांची समाधी असल्याने या परिसराचे मोठे महत्त्व आहे. या परिसराचा विकास करतानाच शंभूछत्रपतींनी ज्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेत सुराज्य निर्माण केले त्याच इतिहासातून प्रेरणा घेत आपणही समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन परिसराचा विकास करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.- नवल किशोर राम,जिल्हाधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार