शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

‘संतसूर्य तुकाराम’, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तक नष्ट करा

By admin | Updated: June 10, 2014 15:04 IST

‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तकात कपोलकल्पित बदनामीकारक कथा, मजकूर लिहिल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुस्तके फाडून नष्ट करावीत, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी दिला आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांचा आदेश : संतांविषयी बदनामीकारक लेखन देहूगाव (पुणे) : संतश्रेष्ठ तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्यावरील आनंद यादवलिखित ‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ पुस्तकात कपोलकल्पित बदनामीकारक कथा, मजकूर लिहिल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुस्तके फाडून नष्ट करावीत, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी दिला आहे. वाड्मयीन क्षेत्राविषयीचा भारतातील अशाप्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक निकाल आहे. तुकोबारायांचे वंशज संभाजीमहाराज मोरे यांनी संतांच्या बदनामीचे प्रकरण उघडकीस आणले होते. परिणामी यादव यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. संत तुकाराममहाराजांची बदनामी केल्याप्रकरणी 7 एप्रिल 2009 रोजी लेखक आनंद यादव, मेहता पब्लिशिंगचे मालक सुनील अनिल मेहता व हक्कदार स्वाती यादव यांच्याविरुद्ध एक कोटी रुपयांचा दावा संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग विश्वनाथ मोरे यांनी दाखल केला होता. या दोन्ही दाव्यांची अनुक्रमे पाच वर्षे 1 महिना व 4 वर्षे 11 महिने सुनावणी सुरू होती. 27 मे रोजी निकाल लागला. या निकालाची प्रत नुकतीच मोरे यांना मिळाली आहे. ‘संतसूर्य तुकाराम’ व ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या पुस्तकांमध्ये लेखक आनंद यादव यांनी अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषेत बदनामी केली असून, या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील मेहता पब्लिशिंगचे मालक सुनील अनिल मेहता यांनी केले असून, या पुस्तकाचे हक्कदार स्वाती यादव यांनीदेखील ही बदनामी केल्याचा आरोप जयसिंग मोरे यांनी दाव्यात केला होता. त्यानुसार सर्व साक्षी पुरावे तपासले. लेखक, प्रकाशकांना कोणताही ठोस पुरावा देता आला नाही. म्हणून न्यायाधीश जैन यांनी त्यांना दोषी ठरविले. स्वाती यादव यांचे नाव पुस्तकात हक्कदार म्हणून असले, तरी पुस्तकाचे हक्क असलेला कोणताही लेखी पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांची निदरेष मुक्तता झाली आहे.फिर्यादीतर्फे शशिकांत पुराणिक, विनायक कुलकर्णी, संभाजीमहाराज मोरे, जालिंदर मोरे, दिनेश रंधवे, माधवमहाराज शिवणीकर, रमेश बावकर, विलास दीक्षित, दीपक वर्मा, नरहरी चौधरी, ज्ञानेश्वर नामदास आदी 12 साक्षीदार तपासले व अनेक पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर केला गेला. हे सर्व साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायाधिशांनी लेखक व प्रकाशकांना दोषी ठरविले. त्यांना 15 हजार रुपयांचा जामीन व तेवढय़ाच रकमेचा मुचलका द्यावा, असा निकाल दिला आहे. त्याचप्रमाणे दोन्ही पुस्तकांच्या प्रती फाडून नष्ट कराव्यात, असा आदेश दिला.