इंदापूरच्या विकासाला चालना देण्याची इच्छा; प्रवीण माने करणार भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:52 IST2025-07-01T16:43:34+5:302025-07-01T16:52:26+5:30

मतदारांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली, पक्ष नसताना कमी कालावधीत लढवलेल्या या निवडणुकीत मानेंना मतदारांनी ४० हजार मते दिली होती

Desire to promote the development of Indapur Praveen Mane will join BJP | इंदापूरच्या विकासाला चालना देण्याची इच्छा; प्रवीण माने करणार भाजपमध्ये प्रवेश

इंदापूरच्या विकासाला चालना देण्याची इच्छा; प्रवीण माने करणार भाजपमध्ये प्रवेश

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य प्रवाहात येण्याची सूचना, त्यासाठी असणारा कार्यकर्त्यांचा रेटा व इंदापूर तालुक्याच्या विकासाला चालना देण्याची इच्छा यामुळे आपण बुधवारी ( दि.२) चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये होणा-या कार्यक्रम भाजपमध्ये प्रवेश करत आहोत,अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऑगस्ट महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूरात कार्यकर्ता व शेतकरी मेळावा घेण्याचे नियोजन सुरु आहे असे ही माने यांनी स्पष्ट केले. माने यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेस मयुर पाटील, बबन लावंड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
    
प्रवीण माने म्हणाले, २०१७ ला सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलो. पाच वर्षात इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी हजार कोटी रुपयांचा निधी आणला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, मतदारांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली. पक्ष नसताना कमी कालावधीत लढवलेल्या या निवडणुकीत मतदारांनी ४० हजार मते दिली. नंतरच्या काळात लोकांनी आणलेली शासनाच्या पातळीवरची कामे करण्यासाठी, प्रशासकीय अडचणी येऊ लागल्याने, मुख्य प्रवाहात येण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. दरम्यानच्या काळात या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, रवींद्र चव्हाण दौंडचे आ. राहुल कुल व इतर नेत्यांबरोबर आमची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही अनेक भेटी झाल्या. त्यांनी ही मुख्य प्रवाहात यावे असे सांगितले. त्यामुळे सारासार विचार करुन आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करताना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला जाईल. पक्ष देईल ती जबाबदार पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल असे माने यांनी स्पष्ट केले. या वेळी मयुर पाटील,बबन लावंड यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Desire to promote the development of Indapur Praveen Mane will join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.