शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वणवण थांबली; चारा प्रश्न गंभीरच!

By admin | Updated: September 25, 2015 01:23 IST

जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे.

पुणे : जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे. श्रावणातही ४९ टँकरने जिल्ह्यात सुरू असलेला पाणीपुरवठा आता २० टँकरवर आला आहे. मात्र बारामतीच्या जिरायती भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.५ जूननंतर जिल्ह्यात मान्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६0.0६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले ३२ टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. मात्र, जुलै महिन्यात ५७.0५, आॅगस्ट महिन्यात ३४.६३ इतकाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात पुन्हा ‘पाणी पाणी रे’ करण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा जिल्हा प्रशासनाने टँकर वाढवून ते ४९ केले आहेत. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्हात १८0.४७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या १२३. ५७ इतका आहे. जूनपासून आतापर्यंत ६४२.१७ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या ७५.९३ इतका आहे. अजून २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. पाणीसाठ्यांतील तूट मात्र चिंताजनकच आहे. (प्रतिनिधी)माळेगाव : पाठ फिरवलेल्या पावसाने जाता-जाता दमदार हजेरी लावली. परंतु, समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्तच आहेत. शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, मोठ्या जनावरांचे काय करावे? असा प्रश्न बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे. दरम्यान, चारा छावण्या उभ्या करण्याकरिता सरकारी आदेशानुसार जनावरांच्या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु शेतकरीवर्गामधून ‘चारा छावण्या नको,डेपो द्या’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. चारा छावणी झाल्यास लोकांना आपली जनावरे छावणीमध्ये घेऊन जावी लागतात. यामुळे त्याठिकाणी घरातील एक व्यक्ती अडकून पडते. एकीकडे जनावरांचा जीव वाचविण्यासाठी धडपड, तर दुसरीकडे स्वत:चे पोट भरण्यासाठीची वणवण. त्यातच छावणीवर थांबणाऱ्या व्यक्तीसाठी खाण्या-पिण्याची सोय करावी लागते.दूध काढणे व विक्रीची समस्या, जनावरांना साथीच्या रोगांचा होणारा प्रादुर्भाव व इतर येणाऱ्या अडचणी यांमुळे शेतकऱ्यांमधून चारा डेपोची मागणी होत आहे.२०१२ साली चारा डेपो उघडण्यात आले होते. परंतु अडचणी आल्याने तीन महिन्यांमध्येच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. बारामती तालुक्यातील ६४ ते ६७ गावे दुष्काळसदृश आहेत. पूर्वीसुद्धा ६४ गावांकरिता छावण्या उभारण्यात करण्यात आल्या होत्या. या वर्षीही ज्या गावांची आणेवारी ५० टक्केच्या आत असेल तेथे चारा डेपो किंवा छावण्या उभ्या राहतील. याकरिता जनावरांचा सर्व्हे केला जात आहे. माळेगाव बुद्रुक व माळेगाव खुर्द हा भाग बागायती असल्याने सध्या चाऱ्याची समस्या दिसत नाही. परंतु पाऊस न झाल्यास चाऱ्याची कमतरता निर्माण होईल, असे माळेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांचे मत आहे. (वार्ताहर)