"साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे"; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 08:39 IST2025-01-11T08:39:31+5:302025-01-11T08:39:47+5:30

दौंड येथे बोलताना उपमख्युमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टोलेबाजी केली

Deputy Chief Minister Ajit Pawar statement that Baramati is with him after Sharad Pawar | "साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे"; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला

"साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे"; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला

DCM Ajit Pawar: बारामतीमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राहिला असला तरी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा मतदारसंघ आपल्याच बाजूने असल्याचे दाखवून दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार लाखांच्या फरकाने निवडून आले. बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचा पराभव करुन अजित पवार आठवड्यांना आमदार झाले. आता याविषयी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारने विविध लोककल्याणकारी निर्णय घेऊन जनतेची मते जिंकली, असं अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहूद्देशीय नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना बारामतीकर कोणासोबत आहेत हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. भावाला वाटलं साहेबांच्या मागे बारामती आहे. पण त्यांना काय माहिती साहेबांच्यानंतर बारामती अजित पवारांच्या मागे आहे असा टोला अजित पवारांनी लगावला. माझ्या विरोधात संपूर्ण खानदान उतरलं होतं, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

"लोकसभेला आमची एकच जागा आल्याने आम्ही विधानसभेला २५ टक्के जागा घेतल्या. अधाशासारख्या जागा मगितल्या नाही पण त्याचा फायदा झाला. मर्यादित ठिकाणी काम करून आम्ही यश मिळवले. माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार ४८ हजार मतांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला होती की नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करु. अरे नाही, बारामती साहेबांच्या मागे आहे. मी कुठे नाही म्हणतोय. साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे. मला लाखांच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपलं गप बसलो. सगळं खानदान माझ्या विरोधात प्रचार करत होतं. जरी माझ्या बंधूंनी त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभे केले तरी माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवले आणि लाखभराच्या फरकाने मला विधानसभेत विक्रमी आठव्यांदा पाठवले," असं अजित पवार म्हणाले.

देवगिरीला काळी बाहुली बांधणार

"मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही. विरोधक सांगत होते, १५०० रुपयांमध्ये काय होणार? परंतु चांगल्या योजना आणल्यावर काय होते, ते विरोधकांनी पाहिले आहे. आता आम्हाला दृष्ट लागू नये म्हणून आम्ही काळी बाहुली देवगिरीला बांधणार आहोत," असाही मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar statement that Baramati is with him after Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.