शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

नोटाबंदी वर्षपूर्तीचे सोशल मीडियावर ट्रोलिंग; सकारात्मक-नकारात्मक पोस्टचे फुटले पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:59 AM

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्मक पोस्टचे पेव फुटले आहे. वर्षपूर्तीनिमित्त नोटाबंदीचे जोरदार ट्रोलिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्देजवळपास ८६ टक्के चलन रद्द करणार्‍या निश्चिलनीकरणाला आज एक वर्ष पूर्ण‘तुमको ना भूल पायेंगे’ असे म्हणत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांना श्रद्धांजली

पुणे : ‘नोटाबंदीग्रस्त प्यारे देशवासियों’, ‘नव्या नोटांची प्रथम पुण्यतिथी’, ‘नोटाबंदी-हत्याकांड की आत्महत्या?’, ‘मोदींनी १०० दिवस मागितले होते, आम्ही ३६५ दिवस दिले आता काय?’, ‘८ नोव्हेंबर २०१७ला नवी नोटाबंदी’, ‘८ नोव्हेंबर २०१७ ला महावितरणने भारनियमन घोषित करावे’, ‘नोटाबंदी-वर्षातील सर्वांत मोठा विनोद’ अशा प्रकारच्या पोस्ट आणि मेसेजना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्मक पोस्टचे पेव फुटले आहे. वर्षपूर्तीनिमित्त नोटाबंदीचे जोरदार ट्रोलिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियांवर लाखो मेसेज, पोस्ट आणि जोक्सचा पाऊस पडला होता. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व ग्रुपवर संकेदाला एक या वेगाने पोस्ट फिरत होत्या. या पोस्टमधून लोकांचा खूप गोंधळ उडालेला दिसत होता. हा गोंधळ कमी झाल्यानंतर मात्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर या निर्णयावर जोक्स मोठया प्रमाणात सुरुवात झाली होती. त्यानंतर वर्षभरामध्ये सामान्यांना नोटाबंदीच्या अनेक परिणामांना सामोरे जावे लागले. जवळपास ८६ टक्के चलन रद्द करणार्‍या निश्चिलनीकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्तही सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्टना उधाण आले आहे. ‘तुमको ना भूल पायेंगे’ असे म्हणत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आपले शोकाकुल असे म्हणत १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा शोकाकुल अशा विविध मेसेज इनबॉक्समध्ये विराजमान झाले आहेत.

 

मोदीभक्त आणि मोदीविरोधक यांच्यामध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे.  

  • काळ्या पैशांना मिळाली तिलांजली 
  • मोदींच्या धाडसाचे अभिनंदन
  • वंदे मातरम्, राष्ट्रगीताने नोटाबंदीची वर्षपूर्ती होणार साजरी 
  • अँटी ब्लॅक मनी डे  
  • अर्थव्यवस्थेची डिजिटल क्रांती 
  • अशा मेसेजमधून मोदींच्या नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ पोस्टही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. 
टॅग्स :Note BanनोटाबंदीSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअॅप