शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

दिब्रिटो यांच्या पुण्यातील सत्कार सोहळयाप्रसंगी पोलिस बंदोबस्ताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:28 PM

फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्षपदी नाव जाहीर झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या नावाला विरोध केला.

ठळक मुद्देउस्मानाबाद येथे यंदाचे संमेलन १० ते १२ जानेवारी दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा मसापच्या वतीने सत्कार

पुणे : उस्मानाबाद येथे होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची सन्मानाने निवड करण्यात आली आहे. मात्र, काही संस्थांकडून त्यांच्या निवडीला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये होत असलेल्या दिब्रिटो यांच्या सन्मान सोहळयाला पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे.साहित्य महामंडळाने गेल्या वर्षीपासून साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याऐवजी सन्मानाने निवड व्हावी, असा ऐतिहासिक निर्णय घेतला. यंदाचे संमेलन १० ते १२ जानेवारी दरम्यान उस्मानाबाद येथे होत आहे. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. संमेलनाध्यक्षपदी त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काही हिंदुतत्वावदी संघटनांनी त्यांच्या नावाला विरोध केला. उस्मानाबाद येथील संमेलन उधळून लावू, दिब्रिटो यांनी स्वत:हून अध्यक्षपद नाकारावे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया मंगळवारपासून उमटू लागल्या.

नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. सध्या समाजमाध्यमांमधून काही व्यक्ती द्वेषमूलक मजकूर आणि प्रतिक्रिया प्रसिध्द करत आहेत. सत्कारप्रसंगी अशा व्यक्ती निदर्शने किंवा कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याची शक्यता वाटते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५.३० वाजल्यापासून साध्या वेशातील काही पोलीस मसापच्या परिसरात बंदोबस्तासाठी किंवा देखरेखीसाठी पाठवावेत, असे पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पोलीस आयुक्तांना लिहिण्यात आले आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन