कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने मागितली ५० हजारांची खंडणी; तिघा मित्रांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 20:46 IST2021-03-02T20:45:29+5:302021-03-02T20:46:04+5:30

तळजाई टेकडीवरील घटना

Demanded a ransom of Rs 50,000 under the pretext of buying a dog; Three friends arrested | कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने मागितली ५० हजारांची खंडणी; तिघा मित्रांना अटक

कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने मागितली ५० हजारांची खंडणी; तिघा मित्रांना अटक

पुणे : दीड लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मित्राला कुत्रा विकत घेण्याचा बहाणा करुन तिघांनी तळजाई टेकडीवर नेले. तेथे कोयत्याचा धाक दाखवून ५० हजारांची मागणी केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

गौरव काळे (रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड), सागर गवळी (रा.बिबेवाडी ओटा स्कीम), रोहन कांबळे (रा.ओटा बिबेवाडी) अशी तिघांची नावे आहेत. याप्रकरणी केंजळेनगर येथील २१ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व तिन्ही आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सागर गवळी याच्यावर दीड लाखांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याला ५० हजाराची गरज होती. त्यातूनच त्यांनी फिर्यादी तरुणाला कुत्र्याचे पिल्लू खरेदी करण्याच्या बहाण्याने तळजाई टेकडी पद्मावती येथे घेऊन गेले. त्यानंतर गवळी याने कोयत्याचा धाक दाखवून या तरुणाकडे ५० हजाराची मागणी केली. मात्र तरुणाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी खोट्या केसमध्ये अडकविण्याची देखील धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणाला तेथून सोडून देण्यात आले होते. घरी आल्यानंतर त्याच्या सोबत झालेल्या प्रकार त्याने घरच्यांच्या कानावर घातला. त्यानुसार त्याने बिबेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली

Web Title: Demanded a ransom of Rs 50,000 under the pretext of buying a dog; Three friends arrested