पुरंदर उपसा योजनेला वाॅटर फिल्टर बसवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:15+5:302021-07-20T04:09:15+5:30

पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी पुरंदर तालुका युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, ...

Demand for installation of water filter in Purandar Upsa Yojana | पुरंदर उपसा योजनेला वाॅटर फिल्टर बसवण्याची मागणी

पुरंदर उपसा योजनेला वाॅटर फिल्टर बसवण्याची मागणी

पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी पुरंदर तालुका युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, पोंढे गावचे दत्ता जाधव, माजी सरपंच संपत वाघले, उपसरपंच नवनाथ वाघले उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पुरंदर उपसाच्या माध्यमातून पुण्याचे सांडपाणी नदीत सोडलेले आहे. हेच पाणी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातीत येत आहे. या परीसरात पाणी आल्याने

पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत खराब झाले आहेत. त्यामुळे लोकांना मुतखडा, त्याचप्रमाणे किडनीचे आजार जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. यामुळे या योजनेला वाॅटर फिल्टर बसवल्यास पिण्याचे पाणी दूषित होणार नाही.

१९ भुलेश्वर

संजय जगताप यांना निवेदन देताना माऊली यादव व इतर.

Web Title: Demand for installation of water filter in Purandar Upsa Yojana