उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 14:30 IST2022-05-25T14:30:06+5:302022-05-25T14:30:13+5:30

दोघेही कोथरूड परिसरात राहत असून ८ महिन्यापूर्वी दोघांची ओळख झाली होती

Demand for bodily pleasures in exchange for Rs. 5,000 taken a 54-year-old arrested | उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड

उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड

पुणे : उसने घेतलेल्या पाच हजार रुपयांच्या बदल्यात विवाहित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या, आणि तिची बदनामी करणाऱ्या एका आंबटशौकीन व्यक्तीला अलंकार पोलिसांनीअटक केली. 38 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत हा प्रकार घडला. दिलीप मरळ (वय 54, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विवाहीत असून वारजे परिसरात राहण्यासाठी आहे. फिर्यादी महिला ही देखील विवाहित असून कोथरूड परिसरात राहण्यासाठी आहे. आठ महिन्यांपूर्वी या दोघांची ओळख झाली होती. फिर्यादी महिलेने आरोपीकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते. हे उसने पैसे परत द्यावेत यासाठी आरोपी यादी महिलेकडे तगादा लावत होता. अन्यथा उसन्या पैशाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी त्याने फिर्यादी महिलेकडे केली होती. इतकेच नाही तर फिर्यादीच्या मैत्रिणीकडे तिच्याविषयी अपशब्द वापरून  बदनामी केली होती. दरम्यान या सर्व प्रकारानंतर या महिलेने अलंकार पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. अलंकार पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Demand for bodily pleasures in exchange for Rs. 5,000 taken a 54-year-old arrested