ना हरकत प्रमाणपत्रासाठी वनपालाने केली दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 19:14 IST2018-10-31T19:14:10+5:302018-10-31T19:14:59+5:30
शस्त्र पनवान्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपालास रंगेहाथ पकडण्यात अाले अाहे.

ना हरकत प्रमाणपत्रासाठी वनपालाने केली दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी
पुणे : शस्त्र परवान्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना दाैंड येथील वनपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रंगहाथ पकडले. समाधान मुरलीधर पाटील (वय 32) असे पकडलेल्या वनपालाचे नाव अाहे. या प्रकरणी दाैंड पाेलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु अाहे.
तक्रारदाराने शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज केला हाेता. हा शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अावश्यक असणारे ना- हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ते दाैंड येथील वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठपुरावा करत हाेते. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे पाटील यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नाेंदविण्यात अाली हाेती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अाज (31 अाॅक्टाेंबर) लाचलुचपत विभागाकडून सापळा रचण्यात अाला. यात पाटील यांना त्यांच्या कार्यालयामध्ये रंगेहाथ पकडण्यात अाले.
ही कारवाई पाेलीस उप अायुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत विभागाकडून करण्यात अाली.