शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Weather Alert! यास चक्रीवादळाने मॉन्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:51 IST

३ जूनला आगमन होण्याची शक्यता, राज्यात ३ दिवस पूर्वमौसमी पाऊस

ठळक मुद्दे मॉन्सूनचे २७ मे पर्यंत श्रीलंकेचा अर्धा भाग, अंदमान, निकोबार तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भागात आगमन झाले होते. मात्र पुढे वाटचाल नाही

पुणे: यास चक्रीवादळानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह कमजोर पडल्याने गेल्या ३ दिवसात मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाचा ३१ मेचा अंदाज आता लांबणीवर पडला आहे. ३ जूनपर्यंत मॉन्सूनचे केरळला आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने यंदा मॉन्सूनचे केरळला आगमन ३१ मे रोजी होईल, असा अंदाज १४ मे रोजी वर्तवला हाेता. हा अंदाज वर्तवतानाच त्यात ४ दिवसांचा फरक पडू शकतो, असे सांगितले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ निर्माण झाले होते. या चक्रीवादळाने सर्व बाष्प खेचून घेतले. त्यामुळे मॉन्सूनचे वारे कमकुवत झाले. मॉन्सूनचे २७ मे पर्यंत श्रीलंकेचा अर्धा भाग, अंदमान, निकोबार तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भागात आगमन झाले होते.

त्यानंतर गेल्या ३ दिवसात मॉन्सूनची पुढे वाटचाल झाली नाही. रविवारी मॉन्सनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही. १ जूनपासून मोसमी वारे पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढे वाटचाल करुन ३ जूनपर्यंत त्याचे केरळला आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात जुन्नर ५६, पुणे २५, ब्रम्हपूरी, बुलढाणा १८, वेंगुला ९, औरंगाबाद६, दाभोलीम ५, सातारा, ५, जळगाव ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

३१मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळWaterपाणी