शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ विभागातील प्रवेशाला विलंब : प्रवेश प्रक्रियेत त्रुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 07:00 IST

विद्यापीठ प्रशासनाने यंदा सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला..

ठळक मुद्देआरक्षण बदल व पुरपरिस्थितीचाही फटका

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील विविध विभागांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून दिले जात आहेत. शासनाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार विद्यापीठाला प्रवेश प्रक्रियेत ऐनवेळी बदल करावे लागले. तसेच सांगली,कोल्हापूर परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेत काही त्रुटी असल्यामुळे योग्य विद्यार्थी विभागांपर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी अर्धा ऑगस्ट महिना संपला तरीही अनेक विभागांमध्ये 100 टक्के प्रवेश झाले नसल्याचे दिसून येत आहे.विद्यापीठातील विभागांमार्फत दिली जाणारी पारंपरिक प्रवेश पद्धती बंद करून विद्यापीठ प्रशासनाने यंदा सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार विज्ञान शाखेच्या काही विभागांमधील सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.मात्र,कला शाखेच्या काही विभागांमधील प्रवेशासाठी दुसरी प्रवेश यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे या यादीतील विद्यार्थी प्रवेश केव्हा घेणार आणि या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यास केव्हा सुरूवात होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेत अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची नावे संबंधित विभागाकडे प्रवेशासाठी पाठविली जातात. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जातात.परंतु, या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र नसल्याचे समोर येते.त्यामुळे काही विभागात प्रवेशाच्या जागा अजूनही रिक्त आहेत.मराठी विभागात केवळ प्रथम वर्ष बीएस्सी पूर्ण केलेला विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आला होता.परंतु,कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित विद्याथ्यार्चा प्रवेश नाकारण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निकषात बदल झाल्यामुळे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रवेश प्रक्रियेत आवश्यक बदल केले.परंतु,यामुळे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया लांबली. विद्यापीठातर्फे राबविली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पारदर्शी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताची असल्याचे सांगितले जाते.परंतु,या प्रवेश प्रक्रियेत काही त्रुटी आहेत.विद्यापीठाने एकाच वेळी सर्व विभागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया न राबवता टप्प्या-टप्प्याने राबविणे सोयीचे ठरले असते,असे विद्यापीठातील काही प्राध्यापकांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठonlineऑनलाइन