शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

देहूगाव कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ? गाथा मंदिरात आढळले तब्बल १८ कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:26 PM

श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच देहूगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे...

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा (दि. ३० मार्च ) अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच देहूगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. हे गेल्या तीन ते चार दिवसांत येथील गाथा मंदिराच्या आवारात १८ रुग्ण सापडले असून देहूतील विविध भागात ३४ रुग्ण आढळल्याने देहूगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून येथे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे.

देहूगावमध्ये नव्यानेच नगरपंचायत स्थापन झाली असून नगरपंचायतीकडे आरोग्य विभागच स्थापन झालेला नाही. त्यामुळे त्यांना सध्या तरी जिल्हा परिषदेच्या सहकार्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून आर्थिक मदत व कर्मचारी वर्ग उपलब्धतेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याने सध्या देहूकरांना अडचणींना सामना करावा लागत असून नागरिकांनांच स्वताची काळजी घ्यावी लागणार आहे.

देहूगाव येथे गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. देहूत सध्या 40 रुग्ण असून त्यातील 26 जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. येथील गाथा मंदिरात काही लोक विविध कामासाठी नेमलेले आहेत. शिवाय येथे वारकरी प्रशिक्षण केंद्रही चालविले जाते. येथील एका व्यक्तीला कोवीडची लक्षणे आढळून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली व मंदिरातील त्याच्या संपर्कातील 72 जणांची तपासणी करण्यात आली असता, 72 पैकी १८ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने त्यांचे तेथेच गृहविलगीकरण करण्यात आले आहे. इतर रुग्णांमध्ये सध्या पिंपरी चिंचवड मधिल कोडीड सेंटर मध्ये ७, खाजगी रुग्णालयात ८ उपचार घेत आहेत.

कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडल्याने येथील प्रशासक तहसिलदार मधुसुन बर्गे यांनी देहूगावत मायक्रो कंटेमेंट झोन जाहीर करण्यासंदर्भात हवेली प्रांत यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. यामध्ये चव्हाणनगर भाग २, गाथा मंदिर, आद्यराही सोसायटी, श्रीकृष्ण मंदिर आश्रम, काळोखे वाडा हे भाग मायक्रो झोन म्हणून जाहीर करावेत म्हणून प्रशासकांकडून प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी दिली.

हवेली पंचायत समिती व जिल्हा परिषदेने देहूतील सुपर स्प्रेडर लोकांची तात्काळ तपासणी मोहीम हाती घेवून सहकार्य करावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. त्याच प्रमाणे गावातील कोवीड सेंटर सुरू करण्यासंदर्भातील ताताडीने निर्णय घ्यावा व तेथे रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची व्यवस्था करावी किंवा इतर खाजगी रुग्णालयात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देता येईल काय याचाही विचार करणे आवश्यक आहे.आकडेवारी- गाथा मंदिर १८माळीनगर ८विठ्ठलनगर ४इंद्रायणी सोसायटी १२.             

टॅग्स :dehuदेहूcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलsant tukaramसंत तुकाराम