शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

घटस्फोटासाठी डॉक्टर पतीकडून फ्लेक्सबाजी करून पत्नीची बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 5:27 PM

हडपसर येथील वेगवेगळ्या चौकांमध्ये पतीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यात  ‘सॉरी’चा उल्लेख

ठळक मुद्दे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : काहीही करून पत्नीने घटस्फोट द्यावा, यासाठी डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीची फ्लेक्सबाजीद्वारे बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील वेगवेगळ्या चौकांमध्ये पतीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यात  ‘सॉरी’चा उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. घटस्फोट आणि आपल्यावरील केस मागे  घेण्यासाठी पत्नीला गळ घालण्यासाठी या फ्लेक्सबाजीचा डॉक्टर पतीने पर्याय शोधला आहे.  रस्त्यात अडवून खून करण्याची धमकी देणे, चेहºयावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी देणे यावरून डॉक्टरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर दाम्पत्याबाबत पुणे कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे. घटस्फोट होईपर्यंत पतीने कुठल्याही प्रकारे पत्नीशी संपर्क साधू नये तसेच तिला धमकावू नये, असा उल्लेख आदेशात केला आहे.  याविषयी अधिक माहिती देताना ठोंबरे म्हणाले, की संबंधित डॉक्टर दाम्पत्याच्या लग्नाला चार ते पाच वर्षे झाली असून त्यांना एक मुलगी आहे. या दोघांमध्ये पुढे काही कारणास्तव वाद होऊ लागल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी ८ लाख रुपयांची तरतूद बँकेत केली होती. मात्र, पतीने ते पैसे मिळावेत, यासाठी पत्नीकडे तगादा सुरू केला. याशिवाय, तिला मारण्याची धमकी देणे, मानसिक व शारीरिक त्रास तो देऊ लागला. हा सगळा प्रकार सहन न झाल्याने पत्नीने न्यायालयात धाव घेतली.  याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर पतीवर शहर विद्रूपीकरण कायद्याद्वारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.......४या डॉक्टर दाम्पत्याचा रविवारी (दि. १६) लग्नाचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने हडपसर भागातील अनेक चौकांमध्ये फ्लेक्स लावण्यात आले आहेत. हा नागरिकांच्या चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरताना दिसत आहे. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDivorceघटस्फोट