शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील काळे, दिगवेकर व बंगेरा यांच्या जामिनावर उद्या निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 8:10 PM

अटक केल्यानंतर आरोपींच्या विरोधात ९० दिवसांच्या आत दोषारोपत्र दाखल करणे बंधनकारक असते.

ठळक मुद्दे९० दिवसांच्या कालावधी उलटल्यानंतरही दोषारोपत्र दाखल नाही दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ डिसेंबर अखेरीस संपणार

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल झाले नाही म्हणून डिफॉल्ड जामिनासाठी अर्ज केला आहे.        प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून आज (शुक्रवार) त्यांच्या अर्जावर निकाल होणार आहे.  तिघांच्याही अटकेला ९० दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे जामीन मिळावा यासाठी बुधवारी अर्ज करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली, अशी माहिती त्यांचे वकील अ‍ॅड.धर्मराज चंडेल यांनी दिली. चंडेल यांनी युक्तिवाद केला की, अटक केल्यानंतर आरोपींच्या विरोधात ९० दिवसांच्या आत दोषारोपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र ९० दिवसांच्या कालावधी उलटल्यानंतरही दोषारोपत्र दाखल न झाल्याने डिफॉल्ड जामीन देण्यात यावा. अर्ज दाखल होईपर्यंत  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले नाही.         दरम्यान या प्रकरणातील सीबीआयचे तपासी अधिकारी दिल्लीतील कामात व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पुर्ण झाला असून न्यायालय त्यावर शुक्रवारी (१४ डिसेंबर) निर्णय देणार आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. ती मुदत डिसेंबर अखेरीस संपत आहे. आरोपींवर बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (युएपीए) वाढविण्यात आले आहे. या कायद्यात तपासासाठी १८० दिवस मिळण्याची तरतुद आहे. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखूनArrestअटकCourtन्यायालय