डेबू राजन खान याची गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:37 IST2023-10-03T12:36:56+5:302023-10-03T12:37:19+5:30
या घटनेवेळी डेबू एकटाच घरात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.

डेबू राजन खान याची गळफास घेत आत्महत्या
पुणे : प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांचा लहाना मुलगा डेबू राजन खान (२७, रा. शिंदे वस्ती, गणेशनगर) याने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी १ ते ४ च्या सुमारास घडली. या घटनेवेळी डेबू एकटाच घरात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिसांनी जिजामाता हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत डेबू खान याला दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. डेबू याने कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्येतून आत्महत्या केल्याचे त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आढळून आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डेबूने कुणाला पैसे दिले, त्याने कुणाकडून पैसे घेतले याबाबींचा तपास तपास तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी करत आहेत.