भिंतीच्या प्लॅस्टरचे काम करत असताना मजुराचा ५ व्या मजल्यावरुन पडुन मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 20:07 IST2018-08-13T19:59:41+5:302018-08-13T20:07:23+5:30

५ व्या मजल्याच्या भिंतीचे प्लॅस्टर करत असताना बांधलेल्या लाकडी पहाडावरुन पडून मजूराचा जागीच मृत्यू झाला.

death of worker due to fall down on fifth floor of building in Wanwadi | भिंतीच्या प्लॅस्टरचे काम करत असताना मजुराचा ५ व्या मजल्यावरुन पडुन मृत्यू 

भिंतीच्या प्लॅस्टरचे काम करत असताना मजुराचा ५ व्या मजल्यावरुन पडुन मृत्यू 

वानवडी : गुलामअलीनगर भागात इमारतीचे काम करत असताना मजुराचा ५ व्या मजल्यावरुन पडून जागीच मृत्यू झाला आहे.. राजशेखर यिरप्पा माताळे अंदाजे वय ४० वर्ष (रा. काळेपडळ, हडपसर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महंमदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलामअलीनगर येथील गल्ली नं ६ मध्ये इमरान सय्यद यांची जागा असलेल्या ठिकाणी इमारतीचे ५ व्या मजल्याच्या भिंतीचे प्लॅस्टर करत असताना बांधलेल्या लाकडी पहाडावरुन पडून मजूराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. अम्रेश पवार व बळवंत परगाडा यांनी प्रसंगवधान दाखवून समोरच्या गँलरीत उडी घेतल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. शंकर राठोड असे इमारत बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. महंमदवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Web Title: death of worker due to fall down on fifth floor of building in Wanwadi