अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:37 IST2018-05-18T13:37:40+5:302018-05-18T13:37:40+5:30
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचं जागीच मृत्यू झालायची घटना नसरापूर परिसरात घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
नसरापूर : भोर येथील सारोळा गाव परिसरात पुणे सातारा महामार्गावर हॉटेल प्रणवच्या समोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव कौशल्या बाजीराव थोपटे (वय ५५ रा. वाठार कॉलनी ता. भोर) असे आहे. दुचाकी चालक गंगादीप माधव नेवसे (वय ३८ वर्षे रा. नायगांव ता. खंडाळा जि. सातारा)यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते या अपघातात जखमी झाले आहेत.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १७ मे) दुपारी (क्र. एम एच -११ / सी .एम ११८४ )या दुचाकीवरुन प्रवास करत असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कौशल्या बाजीराव थोपटे या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यावर संबंधित आरोपीने उपचारासाठी मदत न करता तिथून फरार झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नसरापूर येथील सिध्दीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे गुन्हयाचा पुढील तपास करत आहे.