भरधाव ट्रकच्या धडकेत महिला मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:13 IST2018-09-21T22:13:20+5:302018-09-21T22:13:55+5:30

खराडी-मुंढवा रस्त्यावर चालताना मागुन येणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिला जागीत मृत्यूमुखी पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान घडली.

The death of women in truck accident | भरधाव ट्रकच्या धडकेत महिला मृत्यूमुखी

भरधाव ट्रकच्या धडकेत महिला मृत्यूमुखी

चंदननगर: खराडी-मुंढवा रस्त्यावर चालताना मागुन येणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिला जागीत मृत्यूमुखी पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान घडली. याबाबत सुरज वैजनाथ सोनकांबळी (वय २१ )यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी ट्रक चालक प्रमोद गोवर्धन वाकडे,वय-29 रा.पुष्पक कंपनी समोर आळंदी मरकळ रस्ता धानोरी असे चालकाचे नाव आहे.चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला मिनाबाई वैजनाथ सोनकांबळी( वय४० रा.राघोबा पाटीलनगर, खराडी) या त्यांचा मुलगा सुरज वैजनाथ सोनकांबळी हे दुपारी दोन वाजता खराडी -मुंढवा रस्त्यावरील गंगा आकेर्डीया सोसायटीत हाऊस किपींगचे काम करते होते. सकाळी ९ वाजता दोघे कामावर गेले होते. तेथील काम संपल्यावर दोघेही दुपारी १ वाजता जेवणासाठी घरी गेले व जेवण करून पुन्हा कामावर जात असताना साईनाथनगर चौक ओलांडताना ट्रक एम.एच.12 एनएस 5692 या ट्रकने धडक दिल्याने मिनाबाई सोनकांबळी जागीच कोसळून रक्ताबंबाळ अवस्थेत पडल्या. नागरिकांनी मीनाबाई यांना रूग्णवाहिकेतून हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे नेले असता दरम्यान डॉक्टरांनी मिनाबाई यांना मृत घोषित केले.

Web Title: The death of women in truck accident