बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळून ३ कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:45 IST2017-10-17T11:42:16+5:302017-10-17T13:45:16+5:30

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दत्तवाडी परिसरात घडली आहे. 

The death of three workers collapsed from the ongoing building collapse | बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळून ३ कामगारांचा मृत्यू

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळून ३ कामगारांचा मृत्यू

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दत्तवाडी परिसरात घडली आहे. 
सकाळी १०च्या दरम्यान पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील पाटे डेव्हलपर्सच्या साईटवर हा प्रकार झाला. सातव्या मजल्याचे काम सुरू होते. त्याचवेळी स्लॅब कोसळला. या ठिकाणी एकूण ४ कामगार काम करीत होते. ते खाली कोसळले. यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश साव (वय २६), दुलारी पासवान (वय २८) व मिथुन सिंग (वय २२, सर्व रा. झारखंड) अशी मृतांची नावे आहेत. तर रामु पासवान (वय २४) जखमी आहे. 
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The death of three workers collapsed from the ongoing building collapse