Pune: तरुणाला जीवे मारण्याची धमकी, आठ जणांविरुद्ध गुन्हा; आंबेडकरनगर परिसरात टोळक्याची दहशत

By नितीश गोवंडे | Updated: April 1, 2024 16:54 IST2024-04-01T16:52:56+5:302024-04-01T16:54:13+5:30

घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून नागरिकांना शिवीगाळ केली....

Death threat to youth, crime against eight; Gang terror in Ambedkarnagar area | Pune: तरुणाला जीवे मारण्याची धमकी, आठ जणांविरुद्ध गुन्हा; आंबेडकरनगर परिसरात टोळक्याची दहशत

Pune: तरुणाला जीवे मारण्याची धमकी, आठ जणांविरुद्ध गुन्हा; आंबेडकरनगर परिसरात टोळक्याची दहशत

पुणे : मार्केट यार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात टोळक्याने कोयते. तलवारी उगारून दहशत माजवल्याची घटना घडली. टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून नागरिकांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी राहुल उर्फ लल्या कांबळे (१९), शुभम कांबळे (२०), डुई ताकतोडे (२१), जग्या (चौघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अरशद इस्माइल बागवान (१९, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवानच्या भावाचा आरोपींशी वाद झाला होता.

आरोपी रात्री बागवानच्या घराजवळ आले. त्यांनी तलवारी आणि कोयते उगारून दहशत माजवली. बागवानचे वडील, तसेच शेजारी राहणारे शालम शेख यांना कोयत्याचा धाक दाखवला. आम्ही आंबेडकरनगरचे दादा आहोत, अशी धमकी देऊन घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजवली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे करत आहेत.

Web Title: Death threat to youth, crime against eight; Gang terror in Ambedkarnagar area