फेसबुकवर गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी ; शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 15:23 IST2019-02-12T15:21:21+5:302019-02-12T15:23:18+5:30
नीती गाेखले नामक महिलेने कमेंट करत गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर काॅंग्रेसच्यावतीने शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

फेसबुकवर गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी ; शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज
पुणे : अलिगड येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्ते व नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मक गाेळ्या झाडल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला हाेता. या घटनेच्या विराेधात पुणे शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे साेशल मिडीयाचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पाेस्ट टाकली हाेती. या पाेस्टवर नीती गाेखले नामक महिलेने कमेंट करत गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर काॅंग्रेसच्यावतीने शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारी राेजी अलिगड येथे हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गाेळ्या झाडून नथुराम गाेडसेच्या समर्थनार्थ घाेषणा दिल्या हाेत्या. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले हाेते. या घटनेचा व्हिडीओ माेठ्याप्रमाणावर व्हायरल झाला हाेता. पुरंदरे यांनी आपल्या वाॅलवर 30 जानेवारी राेजी बापू हम शर्मिंदा हैं....तेरे कातिल अभी भी जिंदा हैं अशी पाेस्ट टाकली हाेती. या पाेस्टवर नीती गाेखले नामक महिलेने कमेंट करत अजून दाेन गांधी आहेत. त्यांचा वध करायला एक नथुराम गाेडसे हवे अशी कमेंट केली आहे. या महिलेच्या विराेधात शहर काॅंग्रेसकडून आता शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.