निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST2021-04-17T04:11:09+5:302021-04-17T04:11:09+5:30

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्व-रूपवर्धिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयंतराव कवठेकर (वय ८५) यांचे शुक्रवारी निधन झाले. ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्व-रूपवर्धिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयंतराव कवठेकर (वय ८५) यांचे शुक्रवारी निधन झाले. सूर्यनमस्काराच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

पुण्यातील राजा धनराज गिरजी विद्यालय आणि पेण इथल्या शाळेत त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. सहकारनगर येथील योगी अरविंद सांस्कृतिक मंचाचे ते संस्थापक कार्यकर्ते होते.

स्वेच्छानिवृत्तीनंतर स्व-रूपवर्धिनीचे काम ते अखंडपणे करत होते. वर्धिनीच्या आजोळ प्रकल्पाबरोबरच संस्थेच्या वार्षिक कार्यवृत्ताचे संपादन त्यांनी अनेक वर्षे केले. त्यांच्या निधनामुळे वर्धिनीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधार हरपला आहे.

विनोद रायकर

पुणे : धायरी गाव शिवसेना शाखाप्रमुख विनोद भगवान रायकर (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ,बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार होता. शिवसेना तालुकाप्रमुख दत्तानाना रायकर यांचे ते बंधू होत.

Web Title: Death talk