शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक शंकर सारडा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:00 IST

शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग) ...

शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग) येथे झाले. त्यानंतर ते एस. पी. कॉलेजमधून मराठी विषय घेऊन बी.ए. झाले. मुंबई विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर अमेरिकेतील हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी ‘मास कम्यनिकेशन’चे शिक्षणही पूर्ण केले.

सारडा यांचे १९५० पासून बालसाहित्यात मोठे योगदान आहे. किशोरवयापासूनच सारडा यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांची समीक्षा केली आहे. टॉलस्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला. झिपऱ्या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्ट सेलर बुक्स, ग्रंथसंवत्सर, ग्रंथवैभव, ग्रंथविशेष अशी त्यांची प्रसिद्ध ग्रंथसंपदा आहे. अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देऊन सारडा यांना गौरविण्यात आले होते. याशिवाय, पहिल्या ह. मो. मराठे स्मृती गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.

सारडा यांनी १९६८ मध्ये मराठे यांची ‘निष्पर्ण वृक्षाखाली भरदुपारी’ ही कादंबरी ‘साधना’च्या दिवाळी अंकात ‘अतिथी संपादक’पदी असताना प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. सातारा येथे १९९३ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.

--------------

शंकर सारडा यांनी भूषवलेली पदे :

अध्यक्ष : अ. भा. बालकुमार साहित्य संमेलन, सावंतवाडी (१९९४)

कार्याध्यक्ष : महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन (१९७०)

स्वागताध्यक्ष : मराठी प्रकाशक परिषद (१९७८)

कार्याध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा (१९९३)

कार्याध्यक्ष : पहिले अभिजात साहित्य संमेलन, सातारा (१९९४)

-----------

बालसाहित्य

चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिपऱ्या आणि रत्नी, गुराख्याचे पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदूताचं दु:ख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती

समीक्षा व इतर

काही पुस्तके काही लेखक, गुलमोहोर, पुस्तकांचं जग, दूरदेशचे प्रतिभावंत, ग्रंथविशेष, ग्रंथचैतन्य, ग्रंथसंवत्सर, स्त्रीवादी कादंबऱ्या, दशकातील पुस्तके, ग्रंथवैभव, विश्वसाहित्यातील फेरफटका, प्रिय चौकसराव, अक्षरभेट, बेस्ट सेलर्स, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलेनाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र)

---------------

‘लोकमत’शी विशेष स्नेह

शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीचे संपादक होते. ‘अक्षरभेट’ या पुस्तकामध्ये त्यांनी ‘लोकमत’शी असलेल्या ॠणानुबंधाचा विशेष उल्लेख केला आहे. त्यांनी आवर्जून नमूद केले आहे, की ‘लोकमत’मुळे महाराष्ट्राच्या सर्व भागांतील वाचकवर्गाचा भरघोस प्रतिसाद परीक्षणांना मिळाला. पुस्तकांना मागणीही चांगली आल्याचे प्रकाशकांकडून समजले. ‘लोकमत’चे सर्वेसर्वा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. निर्मल दर्डा यांनी अक्षररंग पुरवणी स्वत:हून काढण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे हे लेखन झाले.

===Photopath===

280121\28pun_2_28012021_6.jpg

===Caption===

शंकर सारडा