चाकण येथे एस टी बसच्या धडकेने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:50 IST2018-04-05T12:50:25+5:302018-04-05T12:50:25+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर मार्केट यार्ड जवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला एसटी बसची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू घटना घडली.

चाकण येथे एस टी बसच्या धडकेने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर मार्केट यार्ड जवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला एसटी बसची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आहे.या अपघातात सोमनाथ बाबू शेंबडे ( वय ४५, रा. गोरे वस्ती, मार्केटयार्डजवळ, चाकण ) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राजू नाना गुलदगड ( वय ४४, रा.चाकण ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एसटी बसचा (एमएच-०६. एस- ८८९२) चालक भाऊराव सुभाष बच्छाव ( वय ३८, रा. कलेक्टर पट्टा, इंद्रायणी कॉलनी, ता.मालेगाव, जि. नासिक ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.