Accident: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू; नवले पुलाजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:55 IST2021-11-29T14:55:18+5:302021-11-29T14:55:42+5:30

अपघातात मृत्यू पावलेल्या तरुण बेवारस तसेच वेडसर असल्याचे त्याच्या कपड्यावरून दिसत आहे

Death of a pedestrian after being hit by an unknown vehicle; Incident near Navale bridge | Accident: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू; नवले पुलाजवळील घटना

Accident: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू; नवले पुलाजवळील घटना

धायरी : अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे ओळख अद्याप पटली नसून ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.  

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ एक पादचारी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव,अमोल काळे व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुण बेवारस तसेच वेडसर असल्याचे त्याच्या कपड्यावरून दिसत आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सिंहगड रस्ता ठाण्याचे पोलीस  करीत आहेत. 

पोलिसांनीच उचलला मृतदेह ... 

घटनास्थळी मृतदेहाचे काही अवशेष रस्त्यावर पडले होते. रस्त्यावर मृतदेह असल्याने पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबविली होती. रुग्णवाहिका आल्यानंतर मृतदेह उचलण्यासाठी कोणीच नागरिक येत नसल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, अमोल काळे व कर्मचाऱ्यांनी स्वतःच मृतदेह रुग्णवाहिकेत उचलून ठेवला. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला.

Web Title: Death of a pedestrian after being hit by an unknown vehicle; Incident near Navale bridge