Pune: गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:45 IST2024-04-22T10:44:36+5:302024-04-22T10:45:20+5:30

घरात स्वयंपाक करत असताना त्यांनी भाजी बनवण्यासाठी पाणी तापवून ठेवले होते...

Death of one and a half year girl due to scalding by hot water, incident in Pune district | Pune: गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

Pune: गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

शिक्रापूर (पुणे) : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) गरम पाण्याने भाजून बालिकेचा मृत्यू झाला आहे. ऋतिका राहुल उमाप (वय दीड वर्ष, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

जातेगाव येथील अनिता उमाप या घरात स्वयंपाक करत असताना त्यांनी भाजी बनवण्यासाठी पाणी तापवून ठेवले होते. यावेळी ऋतिका या दीड वर्षीय बालिकेने गरम पाण्याचे भांडे ओढून घेतल्याने ती भाजली गेल्याने तिच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर घरी नेण्यात आले. मात्र, त्यांनतर अचानक ऋतिका बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी शिक्रापूर येथे आणले.

यावेळी डॉक्टरांनी ऋतिकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत राहुल सुभाष उमाप यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश करपे करीत आहेत.

Web Title: Death of one and a half year girl due to scalding by hot water, incident in Pune district