Pune: झोका खेळताना अचानक गळफास बसून चिमुकलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:54 IST2023-06-19T11:48:36+5:302023-06-19T11:54:04+5:30

एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने आई-वडिलांना धक्का बसला, तर परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली...

Death of a toddler due to sudden strangulation while playing swing | Pune: झोका खेळताना अचानक गळफास बसून चिमुकलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune: झोका खेळताना अचानक गळफास बसून चिमुकलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

धनकवडी (पुणे) : घराबाहेर खिडकीला दोरी आणि टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून एका सातवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी आंबेगाव येथील मल्हारनगरमध्ये घडली. घटना घडली तेव्हा चिमुकलीची ९० वर्षांची आजी एकटीच घरात होती. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने आई-वडिलांना धक्का बसला, तर परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृत मुलीचे वय सात वर्षे असून, ती पहिल्या इयत्तेत शिक्षण घेत होती. तिचे वडील सुरक्षारक्षक आणि आई एका शाळेत आया म्हणून काम करते. पोलिस उपनिरीक्षक वर्षा घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील दोघेही कामावर गेल्यावर चिमुकली आजीसोबत एकटीच होती. तिने घरातील खिडकीला झोका बांधण्यासाठी घरातील एक रस्सी आणि टॉवेल घेतला होता. ती खिडकीला रस्सी आणि टॉवेल बांधत असताना तिचा अचानक तोल गेला. यामध्ये टॉवेलने गळफास बसून चिमुकलीचा मृत्यू झाला.

Web Title: Death of a toddler due to sudden strangulation while playing swing