इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी; भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 15:34 IST2020-04-30T15:33:18+5:302020-04-30T15:34:27+5:30

भिगवण रेल्वे स्टेशन येथील महिला रुग्णावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार

Death of first corona victim in Indapur taluka; Corona infected women died at Bhigwan station | इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी; भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी; भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोना बाधिताच्या मृत्यूने भिगवणकर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण रेल्वे स्टेशन येथे कोरोनाची लागण झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी याबाबतमाहिती दिली.या महिलेच्या रुपाने इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.कोरोना बाधिताच्या मृत्यूने भिगवणकर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिगवण रेल्वे स्टेशन येथील महिला रुग्णावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.गुरुवारी (दि ३०) सकाळी त्यांचे  निधन झाले आहे. या कोरोणाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील १८ जणांचा कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्याची माहिती मिळतअसतानाच हि धक्कादायक बातमी समजली आहे. या बातमीमुळे येथील नागरिक काळजीत पडल्याचे चित्र आहे. भिगवण येथील खासगी हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि पॅथोलॉजी चालक तसेच हॉस्पिटल काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासह रुग्णाच्या कुटंंबातील ४ जणांचा हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये समावेश होता.

बारामती येथील शासकीय दवाखान्यात १४ जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी सायंकाळी मिळाले आहे.तर पेशंटच्याघरातील ४ सदस्यांना ओंध पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते.त्यांचा तपासणी अहवाल गुरुवारी सकाळी मिळाला आहे. तो अहवाल निगेटिव्ह आल्याने भिगवण करांना दिलासा मिळाल्याचे मानले जात होते.मात्र,या रुग्णाच्या मृत्युने दिलासा काळजीत बदलल्याचे चित्र आहे. दरम्यान तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटीव्ह आलेल्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.अमित उदावंत यांनी दिली आहे.मात्र तरीही भिगवण आणि परिसर सील करण्यात आला आहे. कोणीही अत्यंत महत्वाचे काम असल्या शिवाय घरातून बाहेर पडू नये ,असा इशारा प्रभारी पोलीस निरीक्षक जे . एच .माने यांनी दिला आहे .

Web Title: Death of first corona victim in Indapur taluka; Corona infected women died at Bhigwan station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.