शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:41 IST

कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे.

ठळक मुद्देटेकडीच्या नेहमीच कोसळणाऱ्या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आंबेगाव बुद्रुक : कात्रज बाह्यवळण महामार्गावर सतत कडा कोसळत असून कोणत्याही  उपाययोजना  नाहीत.कात्रज बाह्यवळण महामार्गाची निर्मिती  पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी करण्यात आली. आंबेगाव बुद्रुक परिसरात अनेक चढउताराचे रस्ते असल्यामुळे हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असल्यामुळे महामार्गाच्या निर्मितीमुळे आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव पठार असे दोन भाग निर्माण झाले. रस्ता खोदकाम करून समांतर करण्यात आला. परंतु महामार्गाच्या बाजूस असणारे टेकड्यांचे कडे महामार्गावर पडू नयेत, म्हणून प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे  मुसळधार पावसामुळे प्रत्येक वर्षी कडा महामार्गावर कोसळलेला असतोच. प्रशासनाकडून गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.या ठिकाणी नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कात्रज बाह्यवळण रस्ता चर्चेचा विषय ठरत असतो. रस्त्यावर  कात्रज ते नवले पुलादरम्यान लहान-मोठे  खड्डे पडलेले असून ते बुजवले नसल्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत असून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे........कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर सेवा रस्ता नसल्याने अनेक प्रवासी उलट्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. या महामार्गाच्या कडेला आंबेगाव बुद्रुक हद्दीत अभिनव शाळेसमोरील असणारे कडे ढासळत असल्याने वाहनचालक भीतीच्या छायेत आहेत.मागील काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कडा पडला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी कडा पडला असून त्याच्या बाजूच्या कड्याचा भाग सुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी प्रशासन एखादी घटना घडायची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूkatrajकात्रज