शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Pune Crime: दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईताच्या सिंहगड रस्ता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 11:03 AM

आरोपीवर चाळीसहून अधिक गुन्हे दाखल...

धायरी (पुणे) : बंद फ्लॅटची रेकी करून घरफोडी करणारा सराईत चोरटा सिंहगड रस्ता पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. मयुर ऊर्फ अमित ऊर्फ बंटी सोपान भुंडे (वय: ३६ वर्षे, रा. केळेवाडी, कोथरुड. सध्या राहणार : संभाजीनगर, धनकवडी पुणे) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. यातील आरोपींचा शोध सिंहगड रस्ता पोलीस करीत होते. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सागर शेडगे, देवा चव्हाण,अविनाश कोंडे यांना घरफोडीतील आरोपी नऱ्हे परिसरातील सेल्फी पॉइंट परिसरात एका दुचाकीवर बसला असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण चार चोरीच्या गुन्ह्यातील दोन लाख पन्नास हजार किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्हा करताना वापरत असलेले २० हजार रुपयांचे वाहन त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, नलीन येरुणकर, संजय शिंदे, विकास बांदल, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, अमोल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत. 

चाळीसहून अधिक गुन्हे दाखल...घरफोडी प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मयुर ऊर्फ अमित ऊर्फ बंटी सोपान भुंडे याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चाळीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत. अगोदर तो बंद घराची रेकी करीत असे, व त्यानंतर तो एकटाच घरफोडी करीत असल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात लवकर सापडत नव्हता. मात्र सिंहगड रस्ता पोलिसांनी विशेष तपास करून अखेर त्याला शोधून काढले.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसDhayariधायरीtheftचोरी