शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दौंड - पुणे डेमू घटना! ज्या व्यक्तीला वाचवले त्याच्यामुळेच लागली आग, रेल्वे प्रशासनाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:14 IST

प्रवासी स्वच्छतागृहात जाऊन धूम्रपान करत होता, त्याने सिगारेट पेटवून उर्वरित काड्या डस्टबिन मध्ये टाकल्याने कचऱ्यातून धूर येऊ लागला

पुणे : दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. डेमू रेल्वेच्या डब्यात स्वच्छतागृहातून धूर येऊ लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत त्या स्वच्छतागृहात अडकलेल्या प्रवाशाला खिडकीतून इतर नागरिकांनी बाहेर काढले. त्याच प्रवाशाच्या चुकीमुळे आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहनलाल कौल (रा.मध्य प्रदेश) हा प्रवासी स्वच्छतागृहात जाऊन धूम्रपान करीत होता. त्याने बिडी अथवा सिगारेट पेटवून उर्वरित काड्या डस्टबिन मध्ये टाकल्याने कचऱ्यातून धूर येऊ लागला. यावेळी बाहेरच्या प्रवाशांनी आरडाओरड केल्याने आतील प्रवासी घाबरला. आणि आत अडकून पडला. अखेर संबंधित प्रवाशाला बाहेर काढल्यानंतर खरा प्रकार समोर आला. संबंधित व्यक्तीला दौंड रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

आज सकाळी ७.०५ वाजता दौंड वरुण पुण्याकडे जाणार्‍या डेमू रेल्वेच्या तिसऱ्या डब्यात स्वच्छतागृहातून धूर येऊ लागल्याने खळबळ उडाली. त्यावेळी सर्व प्रवासी सावध झाले. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता. उघडू शकले नाही. यावेळी आतमध्ये एक व्यक्ती अडकला होता. जागरुक प्रवाशांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले अखेरीस खिडकी मधून त्या प्रवाश्याला बाहेर काढण्यात आले. यवत रेल्वे स्टेशन नजीक सदर घटना घडल्यानंतर प्रवाशांची समयसूचकता आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कसलेही जिवितहानी अथवा वित्त हानी झाली नाही.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीfireआगPoliceपोलिसSocialसामाजिकCigaretteसिगारेट