Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:52 IST2025-12-21T18:51:51+5:302025-12-21T18:52:39+5:30
Daund Local Body Election Result 2025 दौंडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी, बहुजन समाज पार्टी यांना एकही जागा मिळाली नाही.

Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
दौंड : दौंडला गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती राजकीय दृष्ट्या निर्माण झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी बाजी मारून गड ताब्यात घेतला. नगरसेवक पदासाठी नऊ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. परिणामी या निकालात माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांनी बाजी मारली. मात्र नगरसेवक पदासाठी नागरिक हित संरक्षण मंडळ आणि मित्र पक्षांने १७ जागांवर विजय नोंदवला. आमदार राहुल कुल, नागरिक संरक्षण मंडळाचे प्रमुख प्रेमसुख कटारिया यांना गड जिंकता आला नाही. नगरसेवक पदासाठी त्यांनी बाजी मारली आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी, बहुजन समाज पार्टी यांना एकही जागा मिळाली नाही.
अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि नागरिकहित संरक्षण मंडळ या दोघांना सत्ता मिळाली असली तरी नगरपरिषदेच्या चाव्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे यांच्या हाती दिल्या आहे. दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परिणामी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने बाजी मारली तर नगरसेवक पदासाठी नागरिक ही संरक्षण मंडळानेवर चष्मा ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि नागरिक हित संरक्षण मंडळ या दोघांनीही नगराध्यक्ष पदासाठी विजयाचा दावा केला होता. दरम्यान या पदासाठी घासून निकाल लागेल असेही चित्र शहरात होते. मात्र याला अपवाद म्हणून दुर्गादेवी जगदाळे या ४ हजार ८९१ ची आघाडी घेऊन ठासून निवडून आल्या आहेत.
बाप लेक विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर त्यांची कन्या दुर्गादेवी जगदाळे या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या असल्याने नगरपरिषदेत मुलगी आणि वडील दोघेही पाच वर्षासाठी जनतेचे प्रतिनिधित्व करणार आहे
दीर भावजयी विजयी
नागरिकत संरक्षण मंडळाचे माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया आणि त्यांची भाऊजयी रुचिता कटारिया विजयी झाल्या आहेत
२०१७ ची पुनरावृत्ती
दौंड नगर परिषदेत २०१७ ला नगराध्यक्ष पदासाठी नागरिक हीत संरक्षण मंडळाने नगराध्यक्ष पदासाठी बाजी मारली होती त्यानुसार शीतल कटारिया या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाले होत्या तर नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने बाजी मारून १२जागांवर विजय मिळवला होता. तर नागरिक हित संरक्षण मंडळाला १०जागांवर समाधान मानावे लागले होते याच पद्धतीचा निकाल नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिसून आला.
दुर्गादेवी जगदाळे यांची पार्श्वभूमी
कुमारी दुर्गादेवी जगदाळे या आर्किटेक्ट असून त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा बाळासाहेब जगदाळे १० वर्ष आमदार होते तर त्यांची आजी उषादेवी जगदाळे या १५ वर्ष आमदार होत्या एकंदरीतच सलग २५ वर्ष त्यांच्या घरात आमदारकी होती त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष, दोन वेळा नगरसेवक होते . तसेच त्यांचे चुलते वीरधवल जगदाळे हे माजी नगराध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते एकंदरीतच जगदाळे घराण्याकडे राजकारणा व्यतिरिक्त गावची पाटीलकी आहे.