श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत केदारी यांचं निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 16:49 IST2021-09-22T16:48:09+5:302021-09-22T16:49:06+5:30
गणेशोत्सव काळात देखावा, विसर्जन रथ यांसह इतरही व्यवस्थांमध्ये ते आवर्जून लक्ष देत असत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत केदारी यांचं निधन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत एकनाथ केदारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी ज्योत्स्ना केदारी, मुलगा अमोल केदारी, सून व नातू असा परिवार आहे. बुधवार पेठेतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. तात्यासाहेब गोडसे यांचे ते सहकारी होते. गणेशोत्सव काळात देखावा, विसर्जन रथ यांसह इतरही व्यवस्थांमध्ये ते आवर्जून लक्ष देत असत. विद्यमान अध्यक्ष अशोक गोडसे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले आहे.
गणेशोत्सवासह वर्षभर ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करुन ते निवृत्त झाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाचे विश्वस्त आणि पदाधिका-यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.